• 'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.

  • ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.

  • ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले

  • विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.

  • दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.

Next
Previous

Tuesday 7 May 2013

0

डिंडिम आरती (गौरीहराची आरती)

Posted in
जय देव जय देव जय गौरीहरा
हतप्रभ राक्षस पाहूनी दिव्य तुझ्या त्रिशुला
दिव्य तुझ्या त्रिशुला॥धृ॥

मंत्रे अवघे तुझीया गंगेचे सुर।
नामे अवघी तुझीया गंगेचे सूर।
पूजन मंत्रोच्चारे घे पावन करुनी,
घे पावन करुनी ॥१॥

शूलपाणी रुद्रा, श्री सिद्ध रुद्रा।
स्वरयोगी रुद्रा, मणिभद्र रुद्रा।
ज्योतिलिंग रुद्रा, लिंगेश्वर रुद्रा।
गंगा शिरा धरसी तू तारक भद्रा॥२॥

ओवाळू आरती श्रीगौरीहरा,
ओवाळू आरती श्रीगौरीहरा,
हतप्रभ राक्षस पाहूनी दिव्य तुझ्या त्रिशुला
दिव्य तुझ्या त्रिशुला॥धृ॥

डाउनलोड ऑडिओ फाईल - आरती

0 comments:

अवधूत चिंतन उत्सव

'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध